वाट मिळेल तिथे मन चालते
कधी वळणावर वळते
तर कधी वळणावरच अडखळते
कधी सरळ रस्त्यावर धावते
तर कधी नागमोडी वाटेवर थांबते
वाट मिळेल तिथे मन चालते
कधी सीमेंटच्या जंगलात हरवते
तर कधी डोंगर दरीत विसावते
कधी पाण्याच्या प्रवाहात वाहते
तर कधी कोरडया दुष्काळात राहते
वाट मिळेल तिथे मन चालते
कधी हिरव्यगार बागेत बागड़ते
तर कधी ओसाड माळरानात फरफटते
कधी माणसांच्या घोळक्यात असते
तर कधी स्वताच्या एकांतात बसते
वाट मिळेल तिथे मन चालते
मन वाटेल तसे वागते
कधी वळणावर वळते
तर कधी वळणावरच अडखळते
कधी सरळ रस्त्यावर धावते
तर कधी नागमोडी वाटेवर थांबते
वाट मिळेल तिथे मन चालते
कधी सीमेंटच्या जंगलात हरवते
तर कधी डोंगर दरीत विसावते
कधी पाण्याच्या प्रवाहात वाहते
तर कधी कोरडया दुष्काळात राहते
वाट मिळेल तिथे मन चालते
कधी हिरव्यगार बागेत बागड़ते
तर कधी ओसाड माळरानात फरफटते
कधी माणसांच्या घोळक्यात असते
तर कधी स्वताच्या एकांतात बसते
वाट मिळेल तिथे मन चालते
मन वाटेल तसे वागते
प्रतिक्षा कांबळे (psb)

No comments:
Post a Comment