अबोल मन
तुझ्या ओठांनी मला जे सांगितलं
ते कधी डोळ्यात दिसलंच नाही
आणि डोळ्यांनी जे सांगितलं
ते ओठांवर कधी आलंच नाही
आणि डोळ्यांनी जे सांगितलं
ते ओठांवर कधी आलंच नाही
असा कसा तु अबोल राहिलास
प्रत्येक रहस्य डोळ्यांनी बोललास
कोंडलेल्या भावनांना लपवत आलास
उमललेल्या प्रेमाला सुकवत आलास
प्रत्येक रहस्य डोळ्यांनी बोललास
कोंडलेल्या भावनांना लपवत आलास
उमललेल्या प्रेमाला सुकवत आलास
सोबत असताना मौन राहिलास
प्रत्येक क्षण दुरूनच पाहिलास
जाताना फक्त एवढंच बोललास
सुखी रहा म्हणत हात सोडलास
प्रत्येक क्षण दुरूनच पाहिलास
जाताना फक्त एवढंच बोललास
सुखी रहा म्हणत हात सोडलास
@ प्रतिक्षा कांबळे (psb)
