अंतयात्रा
संपला माझा जीवन प्रवास
माझी निघाली अंत्यात्रा
शेवटचं मला पहवायास
भरली सग्या- सोयऱ्यांची जत्रा
माझी निघाली अंत्यात्रा
शेवटचं मला पहवायास
भरली सग्या- सोयऱ्यांची जत्रा
निरोप ऐकताच माझ्या जाण्याची
दर्शनास आली लोकं दूरदूरची
घर भरले बाहेरच्या गर्दीने
मला दिसेनासे माझ्या घरची
दर्शनास आली लोकं दूरदूरची
घर भरले बाहेरच्या गर्दीने
मला दिसेनासे माझ्या घरची
आक्रोश झाला मायेच्या माणसांचा
बांध फुटला अश्रृंच्या धरणाचा
ज्यांना ना ध्यास माझ्या जगण्याचा
त्यांना ही कंठ फुटला रडण्याचा
बांध फुटला अश्रृंच्या धरणाचा
ज्यांना ना ध्यास माझ्या जगण्याचा
त्यांना ही कंठ फुटला रडण्याचा
दह्या दुधाच्या अंघोळी नंतर
नटवला देह कोऱ्या वस्त्राने
सजविले फुलांनी अन् सुगंधी अत्तराने
शुभ्र शय्या रचविली मित्रांनी
अलगद उचलुन ठेवले आप्तेष्टांनी
नटवला देह कोऱ्या वस्त्राने
सजविले फुलांनी अन् सुगंधी अत्तराने
शुभ्र शय्या रचविली मित्रांनी
अलगद उचलुन ठेवले आप्तेष्टांनी
थाटा-माटाची माझी मिरवणुक
चार खांदेकरी घेऊन निघाले
फुले पैसा अन् लाह्या उधळले
थाट पाहुन मला भरुन आले
चार खांदेकरी घेऊन निघाले
फुले पैसा अन् लाह्या उधळले
थाट पाहुन मला भरुन आले
सजली गादी चंदनाच्या लाकडाची
त्याच्यावर सोडली धार तुपाची
देऊनी दाह मज अग्निचा
केला मार्ग मोकळा मोक्षाचा
त्याच्यावर सोडली धार तुपाची
देऊनी दाह मज अग्निचा
केला मार्ग मोकळा मोक्षाचा
निघाली पाऊले परतीच्या वाटेला
गेले सारे सोडुन मज एकटयाला
हुंदका माझा गळ्यात दाटला
चिंता मज कोण पाहिल माझ्या घरटयाला
गेले सारे सोडुन मज एकटयाला
हुंदका माझा गळ्यात दाटला
चिंता मज कोण पाहिल माझ्या घरटयाला
रिता झाला उंबरठा घराचा
तुटला ऋणानुबंध असंख्य मनाचा
वर्षो न वर्ष एकटक फिरवीत नजर
एकांती असे फ़ोटो माझा भिंतीवरचा
तुटला ऋणानुबंध असंख्य मनाचा
वर्षो न वर्ष एकटक फिरवीत नजर
एकांती असे फ़ोटो माझा भिंतीवरचा
@ प्रतिक्षा कांबळे (psb)
No comments:
Post a Comment