तुझं येणं…..तुझं जाणं
तुझं येणं…..तुझं जाणं (पाण्याचा प्रवाह)
तुझं येणं…तुझं जाणं
तुझं उंचावरून कोसळणं
उत्साहाने तुझं खळखळणं
चंचलते प्रमाणे तुझं उसळणं
मला लाजवतं माझं अडखळणं…..
तुझं उंचावरून कोसळणं
उत्साहाने तुझं खळखळणं
चंचलते प्रमाणे तुझं उसळणं
मला लाजवतं माझं अडखळणं…..
तुझं संथपणे वाहणं
तुझं मध्येच उधळत येणं
तुझं आपमार्जिचे वागणं
मला लाजवतं माझं स्थिर राहणं…..
तुझं मध्येच उधळत येणं
तुझं आपमार्जिचे वागणं
मला लाजवतं माझं स्थिर राहणं…..
तुझं स्वतःच मार्ग शोधणं
तुझं डोंगर-माथ्यातील धावणं
तुझं वेळेप्रमाणे द्विभाजीत होणं
मला लाजवतं माझं संकुचित वागणं….
तुझं डोंगर-माथ्यातील धावणं
तुझं वेळेप्रमाणे द्विभाजीत होणं
मला लाजवतं माझं संकुचित वागणं….
तुझं एखाद्याला जीवदान देणं
तुझं एखाद्याचे जिव घेणं
तुझं तुझ्याच मर्यादेत असणं
मला लाजवतं माझं अस्तित्व विसरणं…..
तुझं एखाद्याचे जिव घेणं
तुझं तुझ्याच मर्यादेत असणं
मला लाजवतं माझं अस्तित्व विसरणं…..
किती शिकायचं आहे तुझ्याकड़णं
तुझ्या सारखं आयुष्य जगणं
वेळेप्रमाणे उसळणं वेळेप्रमाणे थांबणं
उंचावरुन पडुन सुद्धा नव्याने वाहणं….
तुझ्या सारखं आयुष्य जगणं
वेळेप्रमाणे उसळणं वेळेप्रमाणे थांबणं
उंचावरुन पडुन सुद्धा नव्याने वाहणं….
तुझं येणं….तुझं जाणं….
मला लाजवतं माझं जगणं…
मला लाजवतं माझं जगणं…
@ प्रतिक्षा कांबळे (psb)
No comments:
Post a Comment