शेवटची एक भेट
तुझी एक भेट सख्या
मला खुप काही देऊन गेली
ताटातुट जरी झाली तरी
एक नवे जिवन देऊन गेली
मला खुप काही देऊन गेली
ताटातुट जरी झाली तरी
एक नवे जिवन देऊन गेली
राग द्वेष मत्सर
सगळाच शांत झाला
डोळ्यातील अश्रुंवर
स्मितहास्याने मात केला
सगळाच शांत झाला
डोळ्यातील अश्रुंवर
स्मितहास्याने मात केला
तुझ्या एका स्पर्शाने
आयुष्याचा आधार दिला
तुझ्या एका नजरेने
एक नवा दृष्टिकोन दिला
आयुष्याचा आधार दिला
तुझ्या एका नजरेने
एक नवा दृष्टिकोन दिला
विचारांची मळभ दुर झाली
दोन मनांच्या संवादाने
जुळुनी आले काळीज
जे विस्कटले होते वादाने
दोन मनांच्या संवादाने
जुळुनी आले काळीज
जे विस्कटले होते वादाने
जाता जाता देऊन गेलास
गुच्छ प्रेमळ आठवणींचे
पुरतील आयुष्यभरासाठी
एवढे दिलेस क्षण साठवणींचे
गुच्छ प्रेमळ आठवणींचे
पुरतील आयुष्यभरासाठी
एवढे दिलेस क्षण साठवणींचे
प्रतिक्षा कांबळे (psb)
No comments:
Post a Comment